Anuradha Vipat
घरच्या घरी फेशिअल केल्याने चेहऱ्याचा थकवा दूर होऊन त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
तुम्ही स्वयंपाकघरातील नैसर्गिक गोष्टी वापरून फक्त ३० मिनिटांत बेस्ट रिझल्ट मिळवू शकता.
फेशिअलची सुरुवात नेहमी चेहरा स्वच्छ करण्यापासून होते. यामुळे चेहऱ्यावरील धूळ आणि जास्तीचे तेल निघून जाते.
तांदळाचे पीठ आणि मध हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर आणि मानेवर वर्तुळाकार फिरवत २ ते ३ मिनिटे अगदी हलक्या हाताने मसाज करा.
वाफ घेतल्यामुळे चेहऱ्याचे बंद झालेले रोमछिद्र उघडतात, ज्यामुळे पुढील स्टेप्समधील पोषण त्वचेच्या आतपर्यंत पोहोचते.
मसाज केल्यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
बेसन, दही आणि एक चिमूटभर हळद ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे वाळू द्या. पॅक पूर्ण सुकण्यापूर्वीच साध्या थंड पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.