Anuradha Vipat
कलश हे पवित्रता, समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. लक्ष्मीपूजन करताना कलशाची स्थापना करणे शुभ मानले जाते.
आज आपण लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवताना तो कसा हटके पद्धतीने सजवावा हे पाहूयात.
तांब्याचा किंवा पितळेचा कलश वापरा. कलशावर हळद-कुंकवाचा स्वस्तिक काढा.
कलश पाण्याने भरा. त्यात एक नाणे , सुपारी, तांदूळ आणि झेंडूचे फूल घाला. कलशाच्या तोंडावर ५ किंवा ७ आंब्याची पाने ठेवा.
नारळाच्या शेंडीवर लाल वस्त्र गुंडाळून ते नारळ कलशावर ठेवा.Kalash Decor Ideas
कलश ठेवण्याच्या जागेवर रांगोळी काढा.
कलशाभोवती झेंडूच्या फुलांची किंवा गुलाबाच्या फुलांची माळ लावा.