Kairi Panha Benefits: उन्हाळ्यात प्या कैरीचं पन्हं, त्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Deepak Bhandigare

पारंपरिक पेय

कैरीचे पन्हे हे एक पारंपरिक भारतीय उन्हाळी पेय असून, ते उन्हाळ्यात शरीराला थंडावा देत आपल्याला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते

Kairi Panha Benefits | Agrowon

डिहायड्रेशन

उन्हाळ्यात शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, यामुळे कैरीच्या पन्ह्यात असलेले मीठ आणि साखर हे घटक पाण्याची कमतरता भरून काढतात तसेच शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासही मदत करतात

Kairi Panha Benefits | Agrowon

पचनक्रिया

कच्च्या आंब्यातील फायबर आणि एन्झाइम्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात, तसेच त्यातील जिरे आणि काळे मीठ गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करतात

Kairi Panha Benefits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

कच्चा आंबा हा 'व्हिटॅमिन सी'चा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी राहते

Kairi Panha Benefits | Agrowon

उष्माघातापासून बचाव

उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी आंब्याचे पन्हे पिणे फायदेशीर मानले जाते, ते तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करु शकते

Kairi Panha Benefits | Agrowon

वजन घट

कच्च्या आंब्यात कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि ते चयापचय वाढवण्यासाठी मदत करते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहू शकते

Kairi Panha Benefits | Agrowon

थंडावा

कैरीचे पन्हे त्याच्या थंड गुणधर्मांसाठी ओळखले जाते, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्णतेमुळे होणाऱ्या विविध त्रासांपासून शरीराला आराम मिळतो

Kairi Panha Benefits | Agrowon

चमकदार त्वचा

कच्च्या आंब्याचे पन्हे व्हिटॅमिन ए आणि सी यांचा चांगला स्रोत आहे, हे पोषक घटक चमकदार त्वचेसाठी तसेच डोळ्यांची दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात

Kairi Panha Benefits | Agrowon
Kokum Health Benefits | Agrowon
Kokum Benefits: उन्हाळ्यात कोकम आहे वरदान, जाणून घ्या त्याचे ७ फायदे