Team Agrowon
कांदा पिकामध्ये बेसल रॉट रोगामुळे बाहेरील बाजूस असलेली पाने पिवळी पडतात. त्यानंतर आतमधील पाने पिवळी पडतात. नवीन येणारे मधले पान पिवळे पडून सुकते तसेच सडल्याप्रमाणे दिसते.
या रोगावर उपाय करताना पिकाचे सतत निरीक्षण करावे.
जैविक बुरशीनाशके जसे की ट्रायकोडर्मा व्हिरीडी व पॅसिलोमायसिस लिलासीनस या मित्र बुरशीचा वापर पीक लागवडीपूर्वी संपूर्ण शेतात फवारणी किंवा धुरळणीच्या स्वरूपात करावा. शेणखतात या जैविक बुरशीचा वापर करावा.
लागवडीपूर्वी रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी.
कांदा लागवडीच्या अगोदर यजमान पिके जसे की लसूण, मिरची, टोमॅटो यांची लागवड करणे टाळावे.
जमिनीतून इजा करणारे कीटक जसे की हुमणी, वायर वर्म यांचे नियंत्रण करावे.
खताचा वापर करताना रोपांना व कांद्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.