Anuradha Vipat
दररोज दोरीच्या उड्या मारणे हा एक उत्तम व्यायाम आहे, त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
केवळ १५-२० मिनिटे दोरीच्या उड्या मारल्याने धावण्यापेक्षाही अधिक कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन वेगाने कमी होते.
दोरीच्या उड्या मारल्याने हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
दोरीच्या उड्या मारताना शरीराचा भार हाडांवर येतो, ज्यामुळे हाडे अधिक मजबूत होतात
हा व्यायाम करताना हात, पाय आणि डोळे यांचा ताळमेळ बसवावा लागतो. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते .
नियमित दोरीच्या उड्या मारल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते
व्यायामामुळे तणाव आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते