Aslam Abdul Shanedivan
जगभरात १६ जुलै हा जागतिक सर्प दिवस म्हणून साजरा केला जात असतो. या दिवसाचा मुख्य उद्देश हा सापांच्या विविध प्रजातींबद्दल जागरूकता वाढवणे आहे.
जगभरात सापांच्या ३००० हून अधिक प्रजाती आहे. यापैकी ६०० प्रजाती विषारी असून २०० जाती मानवाला हानी पोहचवू शकणाऱ्या आहेत. भारतात ही सर्वात विषारी असणारे काही प्रजाती आढळतात...
किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप असून तो भारतात ही आढळतो. तो अत्यंत विषारी असून इतर सापांनाही खातो
भारतीय कोब्रा, नाग किंवा चष्माधारी म्हणूनही हा ओळखला जातो. नाग भारतातील अत्यंत विषारी सापांपैकी एक असून नाग चावण्याच्या सर्वाधिक घटना देशात घडतात.
दक्षिण-पश्चिम भारतातील मलबार पिट किंवा रॉक वाइपर हा देशातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे. हा रात्री सक्रिय असतो आणि पहाटे शिकार करतो.
रसेलच्या वाइपरने भारतात इतर कोणत्याही सापापेक्षा जास्त लोक मारले जातात. सर्वच भागात आढळणारा विषारी साप असून हल्ला करण्यापूर्वी मोठा आवाज करतो.
भारतीय क्रेटला कॉमन क्रेट असेही म्हणतात. भारतीय उपखंडातील जंगलात आणि गावांमध्ये आढळतो. याच्या विषामध्ये भरपूर न्यूरोटॉक्सिन असते ज्यामुळे अर्धांगवायू होऊ शकतो