Healthy Jowar Bhakri : आरोग्य सुधारण्यासाठी 'ज्वारीची भाकरी' का आहे सर्वोत्तम?

Anuradha Vipat

उत्तम आणि पौष्टिक 'सुपरफूड'

ज्वारीची भाकरी हा केवळ महाराष्ट्रातील पारंपरिक आहाराचा भाग नाही, तर ते आरोग्यासाठी एक उत्तम आणि पौष्टिक 'सुपरफूड' मानले जाते.

Healthy Jowar Bhakri | agrowon

फायदेशीर

गव्हाच्या चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाणे शरीरासाठी अनेक कारणांनी फायदेशीर ठरते.

Healthy Jowar Bhakri | agrowon

१००% ग्लुटेन-मुक्त

ज्वारी नैसर्गिकरित्या ग्लुटेन-मुक्त असते. त्यामुळे ज्यांना गव्हाचा त्रास होतो किंवा 'सेलिआक आजार' आहे, त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे

Healthy Jowar Bhakri | agrowon

भरपूर फायबर

ज्वारीमध्ये उच्च प्रमाणात डायटरी फायबर असते.यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते, पोट साफ होते आणि बद्धकोष्टतेचा त्रास दूर होतो.

Healthy Jowar Bhakri | agrowon

डायबिटिज नियंत्रणात ठेवते

ज्वारीचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असतो, म्हणजेच ती खाल्ल्यानंतर शरीरातील रक्तातील साखर एकदम वाढत नाही. ती हळूहळू पचते आणि ऊर्जा देते.

Healthy Jowar Bhakri | Agrowon

हृदयाच्या आरोग्यासाठी

ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, तांबे आणि कॅल्शियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात. तसेच यातील फायबर शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.

Healthy Jowar Bhakri | Agrowon

हाडे मजबूत होतात

ज्वारीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण चांगले असते. हे घटक हाडांची घनता वाढवून हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.

Healthy Jowar Bhakri | Agrowon

Horoscope 30 September 2026 : आज नोकरी-व्यवसायात कामाचे योग्य कौतुक होईल

Horoscope 30 September 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...