Rare Calf Delivery: एक-दोन नाही; जर्सी गायीने दिला चार वासरांना जन्म! धाराशिव जिल्ह्यातील दुर्मीळ घटना

Swarali Pawar

दुर्मीळ घटना

धाराशीव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात एका जर्सी गायीने एकाच वेळी चार वासरांना जन्म दिला आहे. या प्रसूतीत गाय आणि चारही वासरे सुरक्षित आहेत.

Rare Cow Delivery | Agrowon

दोन कालवडी, दोन गोरे

गायीने दोन कालवडी आणि दोन गोऱ्यांना जन्म दिला. एकाच वेळी चार वासरे होणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

Rare Cow Delivery | Agrowon

शेतकऱ्यांची उत्सुकता

ही माहिती मिळताच अनेक शेतकरी पाहण्यासाठी येत आहेत.ग्रामीण भागात आनंद आणि आश्चर्याचे वातावरण आहे.

Rare Cow Delivery | Agrowon

फरताडे यांचा गोठा

ही घटना सुरेश फरताडे यांच्या गोठ्यात घडली. ते माजी सैनिक असून २२ वर्षांपासून शेती आणि दुग्धव्यवसाय करत आहेत.

Rare Cow Delivery | Agrowon

विशेष काळजी आवश्यक

चार वासरांमुळे गायीचा चीक अपुरा पडत आहे. म्हणून इतर गायीचे दूध वासरांना द्यावे लागत आहे.

Rare Cow Delivery | Agrowon

वाढलेला खर्च

गायीच्या उपचार आणि आहारावर दररोज सुमारे ४००० रुपये खर्च येतो. गायीच्या तब्येतीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

Rare Cow Delivery | Agrowon

दुर्मीळ प्रसूती

गायींमध्ये जुळी किंवा तिहेरी प्रसूती क्वचित आढळते. मात्र चार वासरांना जन्म देणे ही अतिशय अपवादात्मक घटना आहे.

Rare Cow Delivery | Agrowon

प्रेरणादायी घटना

योग्य आहार आणि काळजीमुळे अशी घटना घडू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही घटना पशुपालन क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Rare Cow Delivery | Agrowon

Turmeric Processing: दर्जेदार हळदीसाठी सुधारित पद्धतीने प्रक्रिया कशी करावी?

Agrowon
अधिक माहितीसाठी...