Swarali Pawar
हळद काढल्यानंतर ती सावलीत साठवून ४–५ दिवसांत शिजवावी. शिजवण्यापूर्वी जाड व बारीक हळकुंडांची प्रतवारी करणे आवश्यक आहे.
हळद शिजवल्याने बुरशी व जिवाणू नष्ट होतात आणि दुर्गंधी कमी होते. यामुळे हळद लवकर वाळते आणि दर्जा टिकून राहतो.
काहीलीत शिजवल्यास इंधन व वेळ जास्त लागतो. हळद समान शिजत नाही आणि कुरकुमीनचे प्रमाण कमी होते.
वाफेच्या साह्याने बॉयलरमध्ये हळद शिजवली जाते. या पद्धतीत कमी वेळात जास्त हळद एकसारखी शिजते.
कमी सरपण, कमी मजूर आणि कमी खर्चात प्रक्रिया होते. हळद ७–८ दिवसांत वाळते आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो.
हळद १२–१५ दिवस उन्हात पातळ थरात वाळवावी. काळ्या मातीत वाळवू नये आणि ओलसर हळद वेगळी ठेवावी.
पॉलीश केल्याने हळद स्वच्छ, चकचकीत आणि आकर्षक दिसते. ड्रम किंवा यंत्राच्या साह्याने पॉलीश करणे सोपे होते.
हळद जाड, मध्यम, लहान आणि कणी अशा प्रकारे वेगळी करावी. योग्य प्रतवारी व स्वच्छ पॅकिंग केल्यास बाजारात चांगला भाव मिळतो.