Anuradha Vipat
शॉर्ट कुर्तीसोबत नेमके काय घालावे हे तुम्ही कोणत्या प्रसंगाला जाणार आहात यावर ठरते.
कॉलेज, शॉपिंग किंवा मित्रांसोबत फिरायला जाताना हे कॉम्बिनेशन सर्वात लोकप्रिय आणि कम्फर्टेबल आहे.
चिकनकारी किंवा प्रिंटेड कॉटन शॉर्ट कुर्तीसोबत मॉम फिट , स्ट्रेट लेग किंवा वाइड लेग जीन्स अतिशय ट्रेंडी दिसते. स्किनी जीन्सपेक्षा सैलसर जीन्स सध्या जास्त फॅशनमध्ये आहे.
उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी आणि ऑफिसमध्ये सोबर पण स्टायलिश दिसण्यासाठी प्लाझो हा उत्तम पर्याय आहे.
स्ट्रेट कट किंवा पेप्लम शॉर्ट कुर्तीसोबत प्लेन पांढरा, काळा किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा फ्लोई कॉटन किंवा रेयॉन प्लाझो घाला. प्रिंटेड कुर्तीवर प्लेन प्लाझो आणि प्लेन कुर्तीवर प्रिंटेड प्लाझो छान उठून दिसतो.
लग्न, हळद, मेहंदी किंवा सणासुदीच्या कार्यक्रमात पारंपरिक आणि रॉयल दिसायचे असेल, तर शॉर्ट कुर्ती आणि शरारा हे सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे.
एम्ब्रॉयडरी, मिरर वर्क किंवा सिल्क फॅब्रिकच्या शॉर्ट कुर्तीसोबत घेरदार जॉर्जेट किंवा सिल्क शरारा आणि त्याला मॅचिंग ओढणी घ्या. शॉर्ट कुर्तीमुळे शराराचा घेर पूर्णपणे उठून दिसतो.