Krishna Janmashtami : घरी बाल गोपाळाचे आगमन? जन्माष्टमीला 'या' ७ सोप्या स्टेप्समध्ये पूर्ण करा पूजा विधी

Anuradha Vipat

सविस्तर विधी

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर घरच्या घरी अगदी सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने बाळकृष्णाची पूजा कशी करावी, याची सविस्तर विधी खालीलप्रमाणे आहे.

Krishna Janmashtami | agrowon

साहित्य

बाळकृष्णाची मूर्ती, पंचामृत,गंगाजल आणि स्वच्छ पाणी, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, विड्याची पाने, सुपारी, नाणी, दिवा आणि अगरबत्ती, तुळशीची पाने , ताजी फुले, नवीन वस्त्रे , बासरी आणि मोरपंख, लोणी , खडीसाखर, पेढे, पंचखाद्य किंवा सुकामेवा आणि धणे-साखरेची पंजिरी.

Krishna Janmashtami | agrowon

विधी

जन्माष्टमीच्या दिवशी रात्री ११:३० च्या सुमारास पूजेची तयारी सुरू करावी. चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड अंथरावे. त्यावर थोडे तांदूळ ठेवून कलश ठेवावा आणि दिवा प्रज्वलित करावा. रात्री ठीक १२ वाजता टाळ्या, घंटा वाजवून किंवा शंखनाद करून कान्हाचा जन्मोत्सव साजरा करावा. 'हरे कृष्ण' किंवा 'गोविंद गोपाळ' नामाचा जयघोष करावा.

Krishna Janmashtami | agrowon

पंचामृत अभिषेक

सर्वात आधी गंगाजल आणि पाण्याने मूर्ती स्वच्छ करावी. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच गोष्टींनी बाळकृष्णाला मनोभावे अभिषेक करावा. अभिषेक करताना 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा सतत जप करावा. बाळकृष्णाला सुंदर नवीन वस्त्रे परिधान करावीत.चंदनाचा टिळा लावावा. त्यांना मुकुट, गळ्यात माळ, हातात बासरी आणि पाठीमागे मोरपंख लावून छान शृंगार करावा आणि चौरंगावरील आसनावर विराजमान करावे.

Krishna Janmashtami | agrowon

अर्घ्य आणि धूप-दीप

बाळकृष्णाला अक्षता, हळद-कुंकू आणि ताजी फुले अर्पण करावीत. धूप आणि तुपाचा दिवा लावून देवाला ओवाळावे.

Krishna Janmashtami | agrowon

आवडता नैवेद्य

बाळकृष्णाला लोणी आणि खडीसाखर यांचा नैवेद्य नक्की दाखवावा. श्रीकृष्णाच्या कोणत्याही नैवेद्यात तुळशीचे पान ठेवल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण मानला जात नाही, त्यामुळे नैवेद्यावर तुळशीचे पान नक्की ठेवावे.

Krishna Janmashtami | agrowon

आरती आणि क्षमाप्रार्थना

शेवटी संपूर्ण परिवारासह श्रीकृष्णाची आरती करावी. पूजेमध्ये काही चूक झाली असल्यास देवासमोर हात जोडून क्षमा मागावी आणि सर्वांच्या सुखाची प्रार्थना करावी.

Krishna Janmashtami | agrowon

Nagpuri Tarri Poha : चमचमीत नाश्ता! हॉटेलसारखे मिळणारे 'नागपुरी तररी पोहे' आता बनवा सोप्या पद्धतीने

Nagpuri Tarri Poha | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...