Anuradha Vipat
खास नागपुरी स्टाईल झणझणीत आणि चमचमीत तररी पोहे घरच्या घरी बनवण्यासाठी खालील सोपी रेसिपी वापरा.
काळे चणे आणि हिरवे/पांढरे मटार , कांदे ,आले, लसूण पाकळ्या, सुके खोबरे , टोमॅटो, काळा मसाला, लाल तिखट, हळद, धणे पूड, मीठ. तेल , कोथिंबीर.
कढईत थोडे तेल घालून मसाले भाजून घ्या. टोमॅटोची वेगळी प्युरी बनवा. कढईत ४-५ चमचे तेल गरम करा. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात टोमॅटो प्युरी आणि तयार केलेले कांदा-खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता.
हळद, लाल तिखट, धणे पूड आणि काळा मसाला घालून १ मिनिट परता.मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात उकडलेले चणे आणि मटार घाला. रस्सा पातळ करण्यासाठी २ कप कोमट पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. गॅस बारीक करून १० ते १२ मिनिटे उकळू द्या.
जाडे पोहे, कांदे, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरे, हळद, ७-८ कढीपत्त्याची पाने, २ चमचे तेल, चवीनुसार मीठ आणि साखर, कोथिंबीर.
पोहे स्वच्छ धुवून भिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि थोडी हळद घालून हलक्या हाताने मिक्स करा. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी द्या.
त्यात कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परता. नंतर उरलेली हळद घाला. आता भिजवलेले पोहे घालून चांगले मिक्स करा. कढईवर झाकण ठेवून बारीक गॅसवर ३-४ मिनिटे पोह्यांना छान वाफ काढून घ्या.