Anuradha Vipat
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते.
हे व्रत केल्याने सर्व संकटांतून मुक्ती मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि देवासमोर हात जोडून दिवसभर प्रामाणिकपणे उपवास करण्याचा 'संकल्प' करावा.
तुम्ही 'निर्जला' किंवा 'फलाहारी' उपवास करू शकता. दिवसभर मनातल्या मनात 'ओम नमो भगवते वासुदेवाय' किंवा 'हरे कृष्ण' महामंत्राचा जप करावा.
उपवासाच्या दिवशी नेहमीचे अन्न, गहू, तांदूळ, डाळी किंवा इतर कोणतेही धान्य खाणे पूर्णपणे वर्ज्य असते. घरात मांसाहार, कांदा, लसूण किंवा मद्यपान अजिबात करू नये.
सफरचंद, केळी, डाळिंब, पेरू यांसारखी फळे आणि काजू, बदाम, मनुके खाऊ शकता. दूध, दही, ताक, पेढे किंवा खवा यांचे सेवन करता येते.
धर्मशास्त्र आणि पंचांगानुसार, जन्माष्टमीचा पूर्ण उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर अष्टमी तिथी सुटल्यावर सोडणे सर्वात उत्तम मानले जाते.