Jackfruit Research : आता कोकणात होणार फणसावर संशोधन

Mahesh Gaikwad

फणसाची लागवड

फणसाची लागवड आणि प्रक्रियेतील भविष्यातील संधी ओळखून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे फणस संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jackfruit Research | Agrowon

फणस संशोधन केंद्र

फणस संशोधन केंद्राचा ४० कोटींचा प्रस्ताव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केला असून त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Jackfruit Research | Agrowon

फणसाच्या जाती

या केंद्रामध्ये फणसाच्या देश-विदेशातील जाती, फणसापासून प्रक्रियायुक्त पदार्थ. उत्पादने यासह विविध गोष्टींसाठी हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

Jackfruit Research | Agrowon

फणसाचे गुणधर्म

कोकणात फणस मुबलक प्रमाणात मिळत असून हे फळ पौष्टिक, आरोग्यदायी गुणधर्म असलेले फळपीक आहे.

Jackfruit Research | Agrowon

फणस मूल्यसाखळी

या फळाचे मूल्यवर्धन केल्यास त्याची मूल्यसाखळी निर्माण होऊ शकते. तसेच त्यातून रोजगार निर्मितीही होऊ शकते.

Jackfruit Research | Agrowon

फणस रोपवाटिका

या संशोधन केंद्राअंतर्गत फणसाच्या विविध जातींची दर्जेदार कलमे तयार करण्यासाठी रोपवाटिकाही उभारण्यात येणार आहेत.

Jackfruit Research | Agrowon

५० एकरात संशोधन केंद्र

लांजा येथील ५० एकर जागेवर हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.

Jackfruit Research | Agrowon
Jackfruit Research | Agrowon