Anuradha Vipat
नवीन घरात शिफ्ट होणे ही एक नवीन सुरुवात असते. वास्तुशास्त्र आणि स्वच्छतेच्या दृष्टीने जुन्या घरातील खालील वस्तू नवीन घरात नेणे टाळावे.
तडे गेलेली भांडी, आरसे किंवा काचेच्या वस्तू नकारात्मकता आणतात असे मानले जाते.
बंद घड्याळ प्रगती थांबण्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे ती दुरुस्त करून घ्या किंवा फेकून द्या.
खूप जुने, फाटलेले किंवा वापरण्यायोग्य नसलेले कपडे नवीन घरात साठवून ठेवू नका.
वास्तुशास्त्रानुसार, जुनी झाडू जुन्या घरातील दारिद्र्य किंवा नकारात्मकता सोबत आणते.
मोडकळीस आलेले किंवा खिळे निघालेले फर्निचर दुरुस्त केल्याशिवाय नेऊ नका.
जुनी औषधे, जुनी वर्तमानपत्रे आणि न लागणारे कागदपत्रे यांचा कचरा नवीन घरात करू नका.