Anuradha Vipat
विमानात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टी घेऊन जाण्यास सक्त मनाई असते.
काही नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
विमानात कोणत्याही प्रकारचे स्फोटक साहित्य, फटाके, आणि तत्सम वस्तू नेण्यास मनाई आहे.
पेट्रोल, रॉकेल, डिझेल, लाइटर फ्लुइड, थिनर, पेंट किंवा सहज आग पकडणारे इतर कोणतेही रसायन नेण्यास मनाई आहे
विमानात पिस्तूल, बंदूक, काडतुसे, आणि सर्व प्रकारची फायरआर्म्स नेण्यास मनाई आहे.
आंतरराष्ट्रीय नियमांनुसार केबिन बॅगेजमध्ये १०० मिलीलीटरपेक्षा जास्त क्षमतेच्या बाटल्यांमध्ये द्रव पदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे.
अतिरिक्त लिथियम बॅटरी किंवा पॉवर बँक केवळ केबिन बॅगेजमध्ये घेऊन जाव्या लागतात, चेक-इन बॅगेजमध्ये नाही.