Sunflower Seeds Benefits : सूर्यफुलाचं फक्त तेलच नाही तर बियाही खाणं फायदेशीर

Team Agrowon

सूर्यफूल जीवनसत्त्व ई आणि टोकोफेरॉलचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. बियांमध्ये असलेले ट्रिप्टोफॅन आणि कोलिन नैराश्य कमी करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

अर्धा कप कोरड्या भाजलेल्या सूर्यफुलाच्या बियांमध्ये ३७० ऊर्जा, सात ग्रॅम तंतू आणि १२ ग्रॅम प्रथिने, जीवनसत्त्व ई १७ ग्रॅम आणि पेंटोथेनिक अॅसिड पाच मिलिग्रॅम असते.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

सूर्यफुलाच्या बियामध्ये कॅल्शिअम, तांबे, लोह, मॅग्नेशिअम, मँगेनीज, सेलेनियम, फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

सूर्यफूल तेलामध्ये ओलिइक ॲसिड आणि लिनोलेइक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. हे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करते.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रतिकारकशक्ती वाढवणारे जीवनसत्त्व ई, जस्त आणि सेलेनियम असते.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

जीवनसत्त्व ई रोगप्रतिकारशक्ती वाढवते. संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करते. शरीरातील निरोगी पेशींना नुकसान होण्यापासून प्रतिबंध करते.

Sunflower Seeds Benefits | Agrowon

जस्त आपल्या शरीराला जळजळ होण्यापासून वाचवते. संक्रमणास प्रतिबंध करते, प्रतिकारशक्ती वाढवते.

Sunflower Seeds Benefits | Agrowon