Aslam Abdul Shanedivan
औषधी गुणधर्म असल्याने आल्यास आयुर्वेदातदेखील महत्त्वाचे स्थान आहे.
पण अनेकांना प्रश्न पडतो की जाते आले वापरावे की वाळलेले?
ताजे आले हे मसाल्यासह चहात वापरले जाते. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे आरोग्यदायी फायद्यांमध्ये योगदान देतात.
तसेच ताज्या आल्यामध्ये क, ब६ ही जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम व पोटॅशियम हे घटकदेखील उच्च प्रमाणात असतात. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात
वाळलेले आले असते त्याला सुंट असे म्हटले जाते किंवा याची पावडर देखील मिळते. पावडर ही पारंपरिक औषधांमध्ये वापरली जाते
तर वाळवलेल्या आल्यात क जीवनसत्त्व मिळत नाहीत. पण यात लोह, कॅल्शियम आणि फायबर सारख्या इतर पोषक घटकांनी समृद्ध असते.
ताजे किंवा वाळवलेले आले या दोन्ही असंख्य आरोग्यदायी फायदे सापडतात. चवीसाठी ताजे आले उत्तम पर्याय असला तरिही आपल्या आरोग्यासाठी वाळलेले आले योग्य पर्याय आहे. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)