sandeep Shirguppe
ओवा खाल्याने शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर पडतात. कफ निघून जाण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो.
मासिक पाळीत पोट आणि कंबर दुखू लागल्यास ओवा तव्यावर गरम करून कोमट पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो.
ओवा, काळे मीठ, आणि सुंठची चूर्ण करून घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रासामध्ये त्वरित आराम मिळतो.
ओव्यात थायमॉल जंतूनाशक घटक असतात, दम्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळासोबत दिवसातून दोनदा ओवा खा.
एक ग्लास पाण्यामध्ये चमचाभर ओवा रात्रभर भिजवून सकाळी मध घालून हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे.
गुडघे दुखत असल्यास ओवा गरम करावा आणि तो एका रुमालात बांधून घेऊन त्याने गुडघ्यांना शेक द्यावा.
सांधेदुखीचा त्रास होत असल्यास ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास चांगला आराम मिळतो.
सतत खोकला येत असेल तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे.
ताप आल्यास ओवा आणि दालचिनी टाकलेला काढा प्या. ज्यामुळे तुम्हाला बरं वाटू लागेल.