ISRO : इस्रोची पुन्हा चमकदार कामगिरी! सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग

Aslam Abdul Shanedivan

इस्रो

भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) पुन्हा चमकदार कामगिरी केली असून आरव्हीएल पुष्पक यानाचे सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केले

ISRO | Agrowon

वायुसेनेचे चिनूक हेलिकॉप्टर

आरएलव्ही 'पुष्पक' वाहन भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून ४.५ किमी उंचीवरुन सोडण्यात आले होते.

ISRO | Agrowon

आरव्हीएल पुष्पक यान

बेंगळुरूपासून काही अंतरावर असलेल्या चित्रदुर्ग येथे आरएलव्ही पुष्पक यानाचे यशस्वी लँडिंग करण्यात आले.

ISRO | Agrowon

तिसऱ्यांदा लँडिंग

इस्रोने ने रविवारी (ता.२३) सलग तिसऱ्यांदा आरएलव्ही पुष्पक यानाचे लँडिंग केले. याआधी २२ मार्च रोजी इस्रोने या यानचे दुसरे यशस्वी लँडिंग केले होते

ISRO | Agrowon

स्वयंचलित लँडिंग

या यशानंतर इस्रोने सांगितले की, लँडिंग करण्यासाठी परिस्थिती योग्य नव्हती. मात्र आव्हानात्मक परिस्थितीत यानाचे स्वयंचलित लँडिंग करण्यात आले.

ISRO | Agrowon

एरोनॉटिकल टेस्ट रेंज

बेंगळुरूच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील चल्लाकेरे येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) येथून सकाळी ७.१० वाजता इस्रोकडून आरएलव्ही पुष्पक विमानाची चाचणी घेण्यात आली होती.

ISRO | Agrowon

यानाचा वापर

इस्रोचा आरएलव्ही एक महत्त्वाकांशी प्रकल्प असून या यानाचा वापर भारतीय अंतराळ वीरांना अंतराळात पाठवण्यासाठी होणार आहे.

ISRO | Agrowon

Cold Milk Benefits : थंड दूध प्या आणि अनेक आजारांना करा 'टाटा बाय बाय'

आणखी पाहा