Swarali Pawar
ज्वारी उगवणीसाठी २५–३०°C तर वाढीसाठी २०–२८°C तापमान योग्य असते. १०°C पेक्षा कमी तापमान असल्यास पिकावर विपरीत परिणाम होतो.
कडाक्याच्या थंडीमुळे बियाण्यांची उगवण मंदावते. लहान रोपांची वाढ थांबते आणि पीक अशक्त दिसते.
जास्त थंडीमुळे पाने पिवळी पडतात व काही वेळा जळल्यासारखी दिसतात.यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होते.
फुलोऱ्याच्या अवस्थेत थंडी पडल्यास परागकण निर्मिती कमी होते. याचा थेट परिणाम धान्य उत्पादनावर होतो.
थंडी आणि ढगाळ हवामानामुळे मावा सारख्या किडी वाढू शकतात. वेळीच लक्ष न दिल्यास नुकसान अधिक होते.
शेतात पुरेसा ओलावा ठेवल्यास थंडीचा परिणाम कमी होतो. हलके पाणी दिल्यास पीक सावरायला मदत होते.
पाने पिवळी पडली असतील तर १९:१९:१९ खताची फवारणी करा. १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी फायदेशीर ठरते.
पीक वारंवार तपासा आणि किडींची लक्षणे पहा. गरज असल्यास चिकट सापळे व कामगंध सापळे उभारावेत.