Roshan Talape
खर्च करताना स्वतःला विचारा, हा खरंच गरजेचा आहे का? ही सवय लावली, तर जास्तीचा खर्च टाळता येतो.
बाजारात जाण्यापूर्वी खरेदीची यादी तयार करा. यादीशिवाय गेल्यास गरज नसलेली खरेदी होऊन खर्च वाढतो.
आर्थिक शिस्त ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सवय लागली की बजेट संतुलित राहते.
आठवड्याचं बजेट आधीच ठरवा. सुरुवातीपासूनच खर्चाचं नीट नियोजन केल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो.
खर्चाचा हिशोब ठेवा. दररोजचा पैसा कुठे जातोय हे लक्षात ठेवा, कारण लहान खर्चच पुढे जाऊन मोठे होतात.
महिन्याच्या सुरुवातीलाच बचत रक्कम बाजूला काढावी आणि उरलेल्या पैशांत घरखर्च चालवा.
ऑफर्स आणि सवलतींचा वापर करा, पण फक्त गरज असेल तेव्हाच. कूपन्स, सेल्स आणि कॅशबॅक शहाणपणाने वापरणं फायद्याचं ठरतं.