Roshan Talape
पावसाळ्यात गाडी नेहमी उंच व कोरड्या ठिकाणीच पार्क करा. जिथे पाणी साचू शकते, अशा जागी गाडी पार्क करू नका.
बॅटरी, वायरिंग आणि फ्यूज बॉक्स नेहमी पाण्यापासून सुरक्षित व कोरडे ठेवा.
टायरची पकड चांगली असल्याची खात्री करा, त्यामुळे ओल्या रस्त्यावरही गाडी सुरक्षित चालते.
कुठेही अडकल्यास गाडी टो करण्यासाठी मदत लागते, यासाठी अडचणीच्या वेळी हेल्पलाइन नंबर जवळ ठेवा.
पावसात स्पष्ट दिसण्यासाठी वायपर नीट चालतात का ते पहा आणि काच स्वच्छ ठेवा.
गाडीवर वॉटरप्रूफ कव्हर घाला म्हणजे ती पावसापासून सुरक्षित राहील.
ब्रेक्स, इंजिन ऑईल, लुब्रिकेशन यांची पावसाळ्याआधी तपासणी करून घ्यावी.
गाडीच्या काचांवर अँटी-फॉग स्प्रे लावा, जेणेकरून धुके येणार नाही.