Swarali Pawar
२०२५ मध्ये केरळमध्ये आतापर्यंत ७२ जणांना संसर्ग झाला असून १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
२०२४ मध्ये ३६ प्रकरणे झाली होती आणि ९ मृत्यू झाले होते. यंदा आकडेवारी दुप्पट झाली आहे.
ज्या तलाव आणि नदीचे पाणी थोडे उष्ण, कोमट असते अशा पाण्यात हा अमीबा वाढतो. तसेच दूषित पाणी नाकावाटे शरीरात गेल्यास तो मेंदूपर्यंत पोहोचतो.
अमीबा संसर्ग फक्त दूषित पाण्यामुळे होतो. तो माणसामाणसात पसरत नाही.
जर अमीबा मेंदूपर्यंत गेला, तर मृत्यूची शक्यता ९५ टक्क्यांहून अधिक असते.
सुरुवातीला डोकेदुखी, ताप, उलट्या होतात. नंतर झटके, भास, बेशुद्धावस्था आणि कोमा येऊ शकतो.
१९६२ पासून जगभरात जवळपास ५०० प्रकरणे नोंदली गेली आहेत. अमेरिका, भारत, पाकिस्तान व ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले.
केरळ सरकारने मोठ्या प्रमाणावर तपासण्या सुरू केल्या आहेत. लोकांना पाण्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर केरळचे सरकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्ताफ अली म्हणाले, "यंदा रुग्ण राज्यभरातून सापडत आहेत. मोठ्या प्रमाणावर तपासण्या सुरू आहेत."