Fruit, Vegetable Production : देशातील भाजीपाला, फळांच उत्पादनात होतेय घट ?

Team Agrowon

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने आपला २०२३-२४ च्या हंगामातील फळे आणि भाजीपाला उत्पादनाचा पहिला सुधारित अंदाज जाहीर केला आहे. तर २०२२-२३ च्या हंगामातील उत्पादनाचा अंतिम अंदाज दिला.

Fruit, Vegetable Production | Agrowon

सरकारने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, २०२२-२३ च्या हंगामात फळे आणि भाजीपाला पिके २८४ लाख हेक्टरवर होती.तर उत्पादन ३ हजार ५५४ लाख टन झाले होते.

Fruit, Vegetable Production | Agrowon

चालू हंगामात २८७ लाख ७० हजार हेक्टरवर उत्पादन २ लाख टनांनी कमी होऊन ३ हजार ५५२ लाख टनांवर स्थिरावेल, असा पहिला सुधारित अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिला.

Fruit, Vegetable Production | Agrowon

गेल्या हंगामात सफरचंद, केळी, द्राक्ष, आंबा आणि कलिंगड उत्पादनात वाढ झाल्याने फळांचे एकूण उत्पादन गेल्या हंगामात वाढून १ हजार १०२ लाख टनांवर पोचले होते.

Fruit, Vegetable Production | Agrowon

भाजीपाल्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, रताळी आणि टोमॅटो वगळता इतर भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे भाजीपाला उत्पादनातही ३४ लाख टनांनी वाढून २ हजार १२५ लाख टनांवर पोचले होते.

Fruit, Vegetable Production | Agrowon

चालू हंगामात फळांचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. फळांचे उत्पादन केळी, संत्रा आणि आंबा उत्पादनात झालेल्या वाढीमुळे १ हजार १२० लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे

Fruit, Vegetable Production | Agrowon

भाजीपाला उत्पादनात घट होण्याची शक्यता असून उत्पादन २ हजार ९३ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. तर कोबी, फ्लॉवर, भोपळा, टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे.

Fruit, Vegetable Production | Agrowon