Team Agrowon
कोणत्याही नदीतून वाहणारे पाणी अखेरीला समुद्राला मिळते. या विषयी ‘हे पाणी वाया जाते’ असे बहुतांश जलतज्ज्ञ बोलताना दिसतात.
पाण्याचे हे चक्र कोट्यवधी वर्षापासून सुरू आहे. ती जमीन व समुद्र या दोन्ही ठिकाणच्या जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे.
समुद्राची क्षारता सरासरी ३५ टक्के आहे. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन, त्याचे बाष्प हवेत जाते. म्हणजे पाणी कमी होते आणि क्षार वाढतात.
पण वर गेलेल्या बाष्पाचे ढग होऊन पुढे कुठेतरी पाऊस पडतो. पावसाचे पाणी नद्यांवाटे पुन्हा समुद्रात माघारी येते. या चक्रामुळेच समुद्रातील क्षारांचे ३५ टक्के प्रमाण कायम राहते.
जर नद्यांचे सर्वच पाणी अडवले व त्या समुद्राला मिळाले नाही तर समुद्राची क्षारता किती वाढेल, याचा विचार करा. यामुळे त्यातील जीवसृष्टी हळूहळू संपुष्टात येईल.
अन्नासाठी सागरी जिवांवर आजही आपली ४० टक्के इतकी मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यांच्या खाद्याची सोय उर्वरित जमिनीवर करणे आपल्याला शक्य आहे का?
त्यामुळे नदयांचे पाणी समुद्रात गेले तरी ते वाया जात नाही.