Deepak Bhandigare
काही अभ्यासांनुसार, भात हा पोषक तत्त्वांचा समृद्ध स्रोत आहे, त्यासाठी त्याचा काही प्रमाणात आहारात समावेश असायला हवा
भातामध्ये नैसर्गिकरित्या भरपूर कर्बोदके (carbohydrates) असल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत होते
पण जास्त प्रमाणात स्टार्चयुक्त अन्नाचे सेवन मधुमेह रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते, म्हणूनच, त्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे
भात हा विविध पोषक तत्त्वांचा स्रोत असून, त्यात लोह यासह काही खनिजे मुबलक प्रमाणात असतात
तसेच भात हा थायमिन, फायबर यांसारख्या जीवनसत्त्वांनीही समृद्ध असतो, थायमिन कमतरतेमुळे स्नायूंमध्ये वेदना आणि आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात
भात सहज पचणारा अन्नपदार्थ असून तो चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतो, यामुळे हा हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे
पोटाशी संबंधित आजाराने त्रस्त आहात का? तर मग भात हा सर्वोत्तम आरोग्यदायी पर्याय आहे, कारण तो पचनास हलका आहे
भातामधील फायबर बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित इतर आजार कमी करण्यास मदत करते