Mahesh Gaikwad
रोज एक सफरचंद खा आणि आजारांना दूर ठेवा, असे म्हटले जाते. पण बऱ्याचदा सफरचंद खाणे आरोग्यासाठी नुकसानकारही ठरू शकते.
सफरचंदामध्ये फ्रुक्टोज म्हणजेच नैसर्गिक साखर असते. त्यामुळे अती प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेहाच्या रूग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे अती खाल्ल्यास काही जणांना गॅस, पोट फुगणे, अपचनाची समस्या होऊ शकते.
दात घासल्याशिवाय सफरचंद खाल्ल्यास यातील आम्ल दातांवरील इनॅमल कमी करू शकते.
काही लोकांना सफरचंद खाल्ल्यामुळे त्यात असलेल्या प्रथिनांमुळे तोंड, ओठ सुजणे किंवा खवखव होणे, यासारखी अॅलर्जीची समस्या होऊ शकते.
सफरचंदाच्या बियांमध्ये अत्यल्प प्रमाणात सायनाइड असतो. जास्त प्रमाणात बिया एकत्र चघळल्यास विषबाधा होऊ शकते.
सफरचंदाची साल धुतल्याशिवाय खाऊ नये. सालीवरील कीटकनाशकांचे अवशेष शरीरात जाण्याची शक्यता असते, ज्यामुळे शरीराला हळूहळू नुकसान करतात.
सफरचंद आरोग्यासाठी गुणकारी असून अतिरेक व खाण्यची चुकीची पद्धत आरोग्यास हानी पोचवू शकते. दररोज १ सफरचंद स्वच्छा धुऊन खाणे फायद्याचे आहे.