sandeep Shirguppe
लेमन टी, ब्लॅक टी आवडीने पितात याचबरोबर दूध घालून केलेला चहाचेही असंख्य शौकीन आहेत.
मस्त दुधाचा फक्कड चहा समोर आला की सुगंधानेच अनेकांना तरतरी येते.
दूध घालून केलेला चहा पिण्याचेही अनेक फायदे आहेत, असे अभ्यासानुसार सिद्ध झालं आहे.
दुधामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुळे हाडे मजबूत होण्यास फायदा होतो.
खासकरून वयस्कर व्यक्तींनी हाडांच्या मजबुतीसाठी दूध घालून केलेला चहा पिल्यास फायदा होतो.
चहामध्ये दूध असेल तर ॲण्टीऑक्सिडंट्स आपल्या शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेतले जातात.
दूध घालून केलेला चहा आपल्याला आलेला स्ट्रेस कमी करण्याचे पेय समजले जाते.
दुधाचा चहा पिण्याचे फायदे असले तरी चहाचा अतिरेक करू नये. जास्तीतजास्त २ कप चहा पिणे ठिक आहे.