sandeep Shirguppe
जगात २० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. बुद्धिबळ फार जुना खेळ आहे.
बुद्धिबळ हा खेळ तुम्हाला केवळ आनंद देत नाही तर तुमच्या मेंदूला आवश्यक असलेलं वर्कऑउट देखील पुरवते.
नियमितपणे बुद्धिबळ खेळणे केवळ तुमच्या मेंदूसाठीच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही आश्चर्यकारक काम करते.
बुद्धिबळामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते आणि हे खेळल्याने हॅपी हार्मोन्स देखील बाहेर पडतात.
बुद्धिबळ खेळल्याने तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यास मदत होऊ शकते.
बुद्धिबळ हे विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये वाढवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.
बुद्धिबळामुळे नियमित सराव एकाग्रता पातळीत लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
खेळादरम्यान खेळाडूंना उत्साह, फ्रस्ट्रेशन आणि निराशा यासह अनेक प्रकारच्या भावनांचा अनुभव येतो.