Biggest Flower : जगातलं सर्वात मोठं फूल ; वास येतो सडक्या मांसासारखा

Mahesh Gaikwad

फुलांचे सौंदर्य

मनमोहक फुलांचे सौंदर्य आणि त्याचा सुगंध सर्वांच्याच मनाला भुरळ घालतो. फुलांवरील प्रेमापोटी अनेकजण घराच्या बाल्कनीमध्ये फुलांची झाडेही लावतात.

Biggest Flower | Agrowon

फुलांचा सुगंध

फूले आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा सुगंध. पण जगात असेही एक फूल आहे. ज्याचा अतिशय घाण वास येतो.

Biggest Flower | Agrowon

रॅफ्लेसिया फूलाचा वास

विशेष म्हणजे हे जगातील सर्वात मोठे फूल आहे. रॅफ्लेसिया असे या फुलाचे नाव असून याचा वास मात्र सडलेल्या मांसा किंवा सडलेल्या मृतदेहासारखा येतो.

Biggest Flower | Agrowon

फुलाचा आकार

रॅफ्लेसिया हे फूल मुख्यत: इंडोनेशियामध्ये आढळते. हे फूल आकाराने जगातील सर्वात मोठे फूल आहे. या फुलाचा व्यास एक मीटरहून अधिक असतो.

Biggest Flower | Agrowon

फुलाचा रंग

रॅफ्लिसिया फुलाचा रंग गडद लाल असतो. हे फूल दिसायला खुपच सुंदर असते. मात्र, यामधून सडलेल्या मांसासारखा दुर्गंधी येते.

Biggest Flower | Agrowon

विलुप्तीच्या मार्गावर

जगातील सर्वात मोठे असणारे हे फूल सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे याच्या संवर्धनाची गरज असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.

Biggest Flower | Agrowon

फुलाचे संवर्धन

दक्षिण-पूर्व आशियातील जंगली भागांमध्ये होत असलेल्या बांधकामांमुळे रॅफ्लेसिया फूल विलुप्त होत असल्याचे सांगितले जात आहे.

Biggest Flower | Agrowon

येथे आढळते

इंडोनेशिया व्यतिरिक्त रॅफ्लेसिया फूल मलेशिया, थायलंड आणि फिलीपाईन्समध्येही आढळते.

Biggest Flower | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....