Donkey Milk : जगातील सर्वात महाग दूध गाढवाचं ; एक लिटरचा दर...

Mahesh Gaikwad

स्वस्थ आरोग्य

भारतातील प्रत्येक घरामध्ये सुदृढ आणि स्वस्थ आरोग्यासाठी लहान मुलांपासून मोठे लोक दूध पितात.

Donkey Milk | Agrowon

आरोग्याप्रति जागरूक

भारतीय घरांमध्ये सामान्यत: गायी, म्हैस किंवा शेळीचे दूध पिण्यासाठी वापरतात. परंतु अलिकडच्या काही वर्षांमध्ये आरोग्याच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या लोकांचा अन्य प्राण्यांच्या दुधाकडे कल वाढत आहे.

Donkey Milk | Agrowon

गाढवाचे दूध

यामध्ये विशेषत: गाढव आणि उंटाच्या दुधाबाबत जागरुकता वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्याच्यादृष्टीने गाढवाच्या दुधाची मागणीही वाढत आहे.

Donkey Milk | Agrowon

औषधासाठी उपयोगी

गाढवाच्या दुधाचा प्रामुख्याने औषधींसाठी वापर केला जातो. बालरोगतज्ज्ञ कधीकधी गाढवाच्या दुधाची शिफारस करतात.

Donkey Milk | Agrowon

सौंदर्य उत्पादने

याशिवाय गाढवाच्या दुधाला त्याच्या वृद्धत्वविरोधी (अँटीएजींग) गुणधर्मांसाठी स्कीन केअर उत्पादन उद्योगातून विशेष मागणी आहे.

Donkey Milk | Agrowon

दुधाला मागणी

अमेरिका आणि युरोपामध्ये गाढवाच्या दुधाला सर्वाधिक मागणी आहे. या देशांमध्ये गाढवाच्या एक लिटर दुधाची किंमत १६० डॉलरपर्यंत आहे.

Donkey Milk | Agrowon

७ हजार रुपये लिटर

भारतातही औषधी उपयोगासाठी गाढवाच्या दुधाला मागणी असून भारतामध्ये गाढवाच्या एक लिटर दुधासाठी ७ हजार रुपये मोजावे लागतात.

Donkey Milk | Agrowon
Donkey Milk | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....