Smurfs Village : जगातलं एकमेव निळशार गाव ; प्रत्येक घराचा रंग आहे निळा

Mahesh Gaikwad

जुजकार गाव

दक्षिण स्पेनमधील अंडालुसिया प्रांतामध्ये जुजकार नावाचे गाव आहे. जगभरात हे गाव 'निळं गाव' म्हणून प्रसिध्द आहे.

Smurfs Village | Agrowon

घरांना निळा रंग

आज या गावातील प्रत्येक घराचा रंग निळा आहे. परंतु एक दशकापूर्वी हे स्पेनमधील साधारण गावांप्रमाणेच एक गाव होते.

Smurfs Village | Agrowon

स्मर्फ्स चित्रपट

मात्र, २०११ साली 'स्मर्फ्स' नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या संपूर्ण गावातील घरांना निळ्या रंगांने रंगविण्यात आले.

Smurfs Village | Agrowon

पर्यटनस्थळ

सुरूवातील गावातील घरांना तात्पुरता निळा रंग देण्यात आला होता. मात्र, जगभरातील लोक जेव्हा हे गाव पाहण्यासाठी येवू लागले, त्यानंतर या गावातील घरांना निळा रंग देणे सुरूच राहिले.

Smurfs Village | Agrowon

मशरूमच्या जाती

जुजकार गावामध्ये १५० हून अधिक मशरूमच्या जाती आढळतात. आणि चित्रपटातील स्मर्फ्स हे मशरूम्समध्ये राहत असल्याने सोनी पिक्चर्सने प्रमोशनसाठी या गावाची निवड केली.

Smurfs Village | Agrowon

स्मर्फ्सची निर्मिती

बेल्जिअममधील कलाकार पेयो उर्फ पियरे कलीफोर्ड यांनी प्रसिध्द 'स्मर्फ्स' ची निर्मिती १९५८ मध्ये केली होती.

Smurfs Village | Agrowon

साईड कॅरेक्टर

'द फ्लूट विथ सिक्स होल्स' नावाच्या कॉमिकमध्ये स्मर्फ्स पहिल्यांदा साईड कॅरेक्टर म्हणून दिसले होते.

Smurfs Village | Agrowon