White Grub Control: हुमणीचा बंदोबस्त करण्यासाठी हे ८ उपाय कराच!

Team Agrowon

हुमणीची ओळख

हुमणी ही एक बहुभक्षी कीड आहे. तिचे नियंत्रण करताना भुंगेरे आणि अळी दोघांचेही व्यवस्थापन गरजेचे असते.

White Grubs Identity | Agrowon

मशागती उपाय

उन्हाळ्यात जमिनीची खोल १५ ते २० सेंमी नांगरणी करावी. त्यामुळे जमिनीतील सुप्त अवस्थेतील भुंगेरे वर येऊन सूर्यप्रकाशाने मरतात किंवा पक्षी त्यांना खातात.

Mechanical Solution | Agrowon

यांत्रिक नियंत्रण

भुंगेरे रात्री झाडांवर बसतात, त्यावेळी फांद्या हलवून ते खाली पाडावेत आणि रॉकेलच्या पाण्यात टाकून नष्ट करावेत.

Mechanical Control | Agrowon

प्रकाश सापळ्यांचा वापर

सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत प्रकाश सापळे लावावेत आणि जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. सामूहिक सहभाग आवश्यक आहे.

Use of light traps | Agrowon

विषारी फांद्यांचा वापर

बाभूळ व कडुनिंबाच्या फांद्यांवर कीटकनाशकाची फवारणी करून त्या शेतात ठेवाव्यात. पाने खाल्ल्याने भुंगेरे मरतात.

Use of Chemical Leaves | Agrowon

अळी नियंत्रण - आंतरमशागत

निंदणी व कोळपणी करताना अळ्या वर येतात व सूर्यप्रकाशाने मरतात. अळ्या हाताने वेचूनही नष्ट करता येतात.

Grub Control - Intercultivation | Agrowon

जैविक उपाय

हुमणीच्या अळ्या आणि भुंगेरे हे पक्षी, मांजर, कुत्रे आणि मुंगुस खातात, त्यामुळे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते.

Biological Solutions | Agowon

रासायनिक व कीडनाशक उपाय

मेटारायझिम अॅनिसोप्ली १० किलो प्रति हेक्टर वापरावा. ही बुरशी हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करते आणि १० ते १५ दिवसांत मरते.

Chemical and pesticide solutions | Agrowon

कीडनाशक प्रमाण

फिप्रोनील (४० टक्के) आणि इमिडाक्लोप्रीड (४० टक्के डब्ल्यू.पी.) हे संयुक्त कीटकनाशक ऊसासाठी ४ ग्रॅम आणि भूईमुगासाठी ३ ग्रॅम प्रमाणात, १० लिटर पाण्यात मिसळून आळवणीसाठी फवारावे.

Pesticide Dosage | Agrowon

Black Elaichi : काळ्या वेलचीत दडलाय चवीसोबतच आरोग्याचा खजिना

अधिक माहितीसाठी...