Anuradha Vipat
रव्याचा डोसा हा बनवायला अत्यंत सोपा आणि चवीला अतिशय कुरकुरीत असतो.
१ कप रवा , १/२ कप तांदळाचे पीठ, १/४ कप मैदा , १/२ कप दही, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले आणि कढीपत्ता, जिरे आणि चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी.
भांड्यात रवा, तांदळाचे पीठ, मैदा, दही आणि मीठ एकत्र करा. त्यात पुरेसे पाणी घालून ताकासारखे पातळ पीठ तयार करा.
पिठात जिरे, हिरवी मिरची, आले, कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून नीट मिक्स करा. हे मिश्रण १५-२० मिनिटे झाकून ठेवा .
तवा चांगला गरम करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. तव्यावर पिठ पसरवा.
कडेने थोडे तेल सोडा. डोसा खालच्या बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
तुमचा गरमागरम रव्याचा कुरकुरीत डोसा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा!