Anuradha Vipat
चमकदार आणि सतेज त्वचेसाठी तुम्ही आठवड्यातून एकदा 'बेसन आणि दह्याचा' हा नैसर्गिक फेसपॅक लावू शकता.
२ चमचे बेसन, १ चमचा दही, चिमूटभर हळद आणि १ चमचा मध .
सर्व साहित्य एकत्र करून त्याची घट्ट पेस्ट तयार करा. चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा आणि हा पॅक मान व चेहऱ्यावर लावा.
२० मिनिटे किंवा पॅक सुकेपर्यंत ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा हलक्या हाताने मसाज करत धुवा.
त्वचेवरील जादा तेल आणि घाण काढून टाकते.
यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेला नैसर्गिकरित्या ब्लीच करते आणि ओलावा टिकवून ठेवते.
कोणताही फेसपॅक लावण्यापूर्वी कानाच्या मागे 'पॅच टेस्ट' नक्की करून पाहा.