Team Agrowon
खरबूज पिकाची लागवड पूर्वी फक्त नदीकडेच्या क्षेत्रात होत होती. मात्र आता या पिकाची लागवड व्यापारी तत्वावर पॉलीहाऊसमध्येही करण्यात येत आहे. पॉलीहाऊसमधील नियंत्रित वातावरणामध्ये वर्षभर लागवड करता येते.
पिकाचा कीड व रोग यापासून चांगल्याप्रकारे संरक्षण करता येते. फळधारणा चांगल्या प्रकारे होते, तसेच पाणी आणि खत व्यवस्थापन उत्तम प्रकारे करता येते.
पॉलीहाऊसमध्ये लागवड करताना उंच गादीवाफे तयार करून खरबूजाची लागवड केली जाते.
दोन गादीवाफ्यामधील अंतर ४ फुट आणि दोन रोपांमधील अंतर १.५ फुट ठेवावे. गादीवाफा उंची १.५ फुट व रुंदी २ फुट असावी.
१० गुंठ्यामधील रोपांची संख्या २ हजार ४०० ते २ हजार ४५० इतकी असावी.
Hanging Musk Melon Production Techniqueखरबूज हे पिक पाण्याला जास्त बळी पडणारे पिक आहे. त्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. खरबुजाला फळधारणा तसेच फळ फुगवण कालावधीमध्ये जास्त पाणी लागते.
परागीभवन केल्यानंतर ५० ते ५५ दिवसांमध्ये खरबुजाचे फळ काढणीस तयार होते. प्रत्येक वेलीला साधारणतः १.५ ते २.० किलो पर्यंत फळांचे उत्पादन मिळते.
Hydroponics Farming Benefits : कमी जागेत जास्त उत्पादन देणाऱ्या हायड्रोपोनिक्स तंत्राचे फायदे