Swapnil Shinde
उत्तराखंडमध्ये 12 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास उत्तरकाशीमध्ये बांधण्यात येत असलेल्या सिल्क्यरा-दांदलगाव बोगद्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे बोगद्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला.
या दुर्घटनेमुळे बोगद्याच्या आत काम करणारे ४१ मजूर अडकले होते.
त्यांना वाचविण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव कार्यात एनडीआरएफ, आयटीबीपी आणि बीआरओ तैनात करण्यात आले.
बोगद्यातून पाणी काढण्यासाठी टाकलेल्या पाईपमधून अडकलेल्या मजूरांना ऑक्सिजन, औषध, अन्न आणि पाणी आत पाठवले जाऊ लागले.
एन्डोस्कोपीद्वारे कॅमेरा आत पाठवण्यात आला आणि अडकलेल्या मजुरांचे फोटो प्रथमच बाहेर आले, त्यांच्याशीही संवाद साधण्यात आला.
१७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर एनडीआरएफची टीम एक-एक करून मजूरांना बाहेर काढत आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी व केंद्रीय राज्यमंत्री व्ही. .के सिंग हेही तिथे उपस्थित आहेत. त्यांनी मजूरांना स्वागत केले.