sandeep Shirguppe
पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मँगनीज, फॉस्फरस, तांबे यांसारख्या घटकांनी समृद्ध असलेल्या ॲव्होकॅडोबद्दल तुम्हाला माहिती आहे.
ॲव्होकॅडो खाण्याचे ७ गुणकारी आरोग्यदायी फायदे आहेत. याच्या नियमीत सेवनाने अनेक आजार दूर होऊ शकतात.
ॲव्होकॅडो तेलात मोनोअनसॅच्युरेटेड आणि ओलिक फॅटी ॲसिड असतात जे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.
ॲव्होकॅडो फळ खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनच्या उत्पादनास चालना मिळते, याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते.
ॲव्होकॅडोमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे त्याचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.
ॲव्होकॅडो शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगल्या कोलेस्टेरॉलचे म्हणजेच एचडीएलचे प्रमाण वाढवते.
ॲव्होकॅडोच्या मदतीने तुम्ही तुमचे डोळे सुरक्षित ठेवू शकता. त्यामध्ये कॅरोटीनॉइड ल्युटीन असते.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार ॲव्होकॅडोचा रस कोरड्या त्वचेच्या समस्येशी लढण्यास मदत करतो.