Anuradha Vipat
सततची चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे अपचनाचा त्रास होतो.
घाईघाईत न जेवता प्रत्येक घास ३२ वेळा चावून खाल्ल्यास लाळ अन्नात मिसळते आणि पचन सुलभ होते.
जेवताना किंवा जेवण झाल्यावर लगेच खूप पाणी पिणे टाळा. यामुळे पाचक रस पातळ होतात. जेवणानंतर ४५ मिनिटांनी पाणी प्यावे.
आहारात पालेभाज्या, फळे, ओट्स आणि तृणधान्यांचा समावेश करा, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारेल.
अति तिखट, तेलकट, जंक फूड आणि मैद्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे मर्यादित करा.
जेवल्यानंतर लगेच झोपू नका. किमान १० ते १५ मिनिटे शतपावली करा.
रात्रीच्या जेवणानंतर ५ ते १० मिनिटे वज्रासनात बसल्याने पोटाकडचा रक्तप्रवाह वाढतो आणि अन्न लवकर पचते.