Mahesh Gaikwad
हमखास पैसा देणार पीक म्हणून उसाकडं पाहिलं जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस शेती करतात.
देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. यातील काही राज्यातलं ऊस हे प्रमुख पीक आहे.
देशात सर्वाधिक ऊस उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये घेतलं जातं. उत्तर प्रदेशमधील शेतकरी ऊसाचं बंपर उत्पादन घेतात.
देशातील एकूण ऊस उत्पादनाच्या तुलनेत उत्तर प्रदेशात वाटा ४४.५० टक्के इतका आहे.
उत्तर प्रदेश पाठोपाठ ऊस उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा नंबर लागतो.
२५.४५ टक्क्यांसह महाराष्ट्र ऊस उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
देशातील टॉप तीन ऊस उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कर्नाटकात १०.५४ टक्के उसाचे उत्पादन घेतले जाते.