Aditya L-1 spacecraft : ‘आदित्य’ ‘एल-१’ यान झेपावले; होणार सूर्याचा अभ्यास!

Aslam Abdul Shanedivan

आदित्य एल-१

भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी शनिवारी (ता.२ सप्टेंबर रोजी) ‘आदित्य एल-१’ हे यान अंतराळात झेपावले होते.

Aditya L-1 spacecraft | Agrowon

नियोजित स्थळी

ते त्याच्या नियोजित स्थळी म्हणजेच ‘लग्रांज-१’ अर्थात ‘एल-१ बिंदू’जवळ काल शनिवारी (ता. ६ रोजी) पोहचले. पण ही मोहीम काय आहे. याबाबतचा हा आढावा…

Aditya L-1 spacecraft | Agrowon

सूर्याचा अभ्यास

सूर्य हा न्युक्लिअर फ्यूजन म्हणजेच ऊर्जा निर्माण करतो. मात्र त्यातील करोना, क्ष-किरण किरणोत्सारासह सुर्याची अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल-१’ पाठवण्यात आला आहे.

Aditya L-1 spacecraft | Agrowon

‘आदित्य एल-१’चं कार्य काय?

‘आदित्य एल-१’ हे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर स्थित असल्याने या यानातील उपकरणे सुर्यापासून निघणाऱ्या करोना आणि किरणोत्सर्गाचे निरीक्षण करेल.

Aditya L-1 spacecraft | Agrowon

१५ लाख किलोमीटर दूर

‘आदित्य एल-१’ हे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने १५ लाख किलोमीटर दूर आहे. ते तेथून निरीक्षणे नोंदवणार आहे.

Aditya L-1 spacecraft | Agrowon

‘एल-१’ बिंदू म्हणजे?

एल-१ म्हणजे पहिला लग्रांज बिंदू. असे एकूण पाच बिंदू असून ते एल-१ ते एल-५ पर्यंत आहेत. जे एकोणिसाव्या शतकात लिओन्हार्ड युलर आणि जोसेफ-लुई लग्रांज यांनी शोधले.

Aditya L-1 spacecraft | Agrowon

एल-१ कशासाठी?

पृथ्वीच्या कक्षेत ‘आदित्य एल-१’ला अधिक विनाअडथळा सूर्याचे निरीक्षण करता आले नसते. ते करता यावे म्हणूनच एल-१ बिंदूची निवड झाली. येथे एका बाजूस पृथ्वी आणि दुसऱ्या बाजूस सूर्य येतो.

Aditya L-1 spacecraft | Agrowon

Coriander Leaves : भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ कोथिंबीर आणि त्याचे फायदे