Aslam Abdul Shanedivan
कोल्हापूर जिल्ह्यातील राधारनगरी धरण आणि परसरात असलेले राधानगरी अभयारण्य हे गवा म्हणजेच इंडियन बायसनसाठी प्रसिद्ध आहे.
राधानगरीसह पश्चिम घाटात अनेक ठिकाणी गव्याचे दर्शन होते. गवा हा भारतातील सर्वात मोठा बैलकुळातील प्राणी आहे.
भारतातील सर्वात मोठा बैलकुळातील गव्याची ताकद, पिळदार शरीर आणि वजनामुळे तो इतर वन्य प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो.
याच गव्याला महाराष्ट्राच्या शेजारी असणाऱ्या गोव्यात राज्य प्राण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
पश्चिम घाटाप्रमाणेच गोव्यातील जंगलांमध्ये गवे मोठ्या प्रमाणात आढळतात.
भारतातील सर्वात मोठा बैलकुळातील प्राणी असणारा गवा बैलाप्रमाणेच दिसतो. मात्र त्याचे शरीर मजबूत, काळसर तपकिरी असते. त्याची उंची साधारणतः ५ ते ६ फूट आणि वजन ७०० ते १००० किलो पर्यंत असू शकते.
गवा हा पूर्णतः शाकाहारी प्राणी असून तो मुख्यतः गवत, पानांचा आहार करतो. तर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गवा संरक्षित प्राणी आहे.