sandeep Shirguppe
चेहरा सुंदर दिसण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील डाग, मुरुम घालवण्यासाठी कोरफड किती महत्त्वाची भुमिका बजावतं.
कोरफड किंवा कोरफडपासून तयार करण्यात आलेल्या कोरफड जेलचाही तुम्ही नियमित वापर करू शकता.
डॉक्टर रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल वापरण्याचा सल्ला देतात. कोरफड जेल चेहऱ्याला लावून झोपल्यामुळे फायदा होतो का?
रात्रभर कोरफड चेहऱ्यावर लावल्याने चेहरा डाग नाहीसे होतात.
त्वचेवरील चमक आणि तेज आणायचे असेल तर दररोज रात्री न चुकता चेहऱ्यावर कोरफड जेलचा वापर करा.
कोरफड जेलमध्ये ९९ टक्के पाणी असतं जे चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उत्तम असतं.
कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, सॅलिसिलिक एसिड, लिग्निन इत्यादी पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचेवर तेज येतं.
कोरफड जेलचा तुम्ही नियमित वापर केला तर त्वचेवर असणारे डाग, मुरुमांपासून तुम्हाला लवकर सुटका मिळू शकते.