Anuradha Vipat
झेंडूचे फूल केवळ सजावटीसाठीच नाही, तर आरोग्यासाठी औषधी वनस्पती म्हणून अत्यंत गुणकारी मानले जाते.
आयुर्वेदात झेंडूच्या फुलांना आणि पानांना जखमा सुकवण्यासाठी आणि त्वचेचे विकार दूर करण्यासाठी रामबाण उपाय मानले गेले आहे.
झेंडूमध्ये असलेल्या 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्मांमुळे कोणत्याही प्रकारची जखम, खरचटणे किंवा त्वचेचे इन्फेक्शन झेंडूच्या पाकळ्यांची पेस्ट लावल्याने लवकर बरे होते .
झेंडूच्या फुलांचा रस किंवा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित होते, ज्यामुळे मुरुमआणि काळे डाग कमी होऊन त्वचा उजळते
झेंडूच्या फुलांमध्ये 'ल्युटीन'नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे डोळ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे
हिरड्यांमधून रक्त येणे किंवा सूज आल्यास, झेंडूच्या फुलांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास दातदुखी आणि हिरड्यांच्या वेदनांपासून त्वरित आराम मिळतो
झेंडूच्या फुलांपासून बनवलेले तेल सांध्यांवर किंवा सुजलेल्या भागावर चोळल्याने सूज कमी होते आणि जुनी सांधेदुखी दूर होते.