Anuradha Vipat
सकाळी नाश्त्याला उकडलेले अंडे खाणे हा आरोग्यासाठी एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे.
अंड्याला 'सुपरफूड' म्हटले जाते, कारण यामध्ये शरीराला आवश्यक असणारी प्रथिने , जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात
उकडलेल्या अंड्यामधून शरीराला ६.३ ग्रॅम उच्च दर्जाचे प्रोटीन मिळते. हे प्रोटीन शरीरातील स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सकाळी अंडे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. यामुळे दुपारपर्यंत अवेळी भूक लागत नाही आणि वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
अंड्यामध्ये 'कोलीन' नावाचे अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व असते. कोलीन मेंदूच्या पेशींच्या विकासासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये'ल्युटीन' आणि 'झेक्सॅन्थिन' नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स वाढत्या वयासोबत कमी होणारी डोळ्यांची दृष्टी सुधारतात
व्हिटॅमिन डी मुळे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत होते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.