Team Agrowon
पुदिन्याची पाने ही आकाराने तुळशीच्या पानांप्रमाणे परंतु जास्त गर्द हिरवी, लहान व लंबगोल असतात.
पुदिना मध्य-पूर्व, भारतीय, ब्रिटिश आणि अमेरिकन पदार्थांमध्ये चहा, पेय पदार्थ, कँडी, जेली, सिरप, आइस्क्रीम इत्यादी रूपात मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
पदार्थाची चव वाढविण्याबरोबरच तो पदार्थ सकस व आरोग्यपूर्ण बनवण्याचे काम पुदिना करतो.
स्वयंपाकातील बनवलेल्या पदार्थाला चांगली चव व विशिष्ट गंध येण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पानांमध्ये इतर कोणत्याही औषधी वनस्पतींपेक्षा जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.
पुदीन्याचा वापर स्वयंपाक, क्रीम, टूथपेस्ट,च्युइंगम, फ्रेशनर, कॅण्डी आणि कुकीज आणि केकमध्ये चॉकलेटसह कॉम्बो म्हणून केला जातो.
सौंदर्य प्रसादने,अरोमाथेरपी आणि नैसर्गिकरित्या तयार केलेल्या कीटकनाशकांमध्ये केला जातो.
शरीरास थंडावा देणारी वनस्पती आहे. वायुहारक, पाचक व वातानुलोमन करणारी आहे. पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट, लघवी साफ होते.
मेंथॉल घटकामुळे सर्दी, वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी, दातदुखी, वातविकार बरे होतात. वांतीहारक, आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव पडतो.