sandeep Shirguppe
पावसाळ्यात योग्य आहार घेणे गरजेचे असते कारण यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
पोषक आहारांमध्ये व्हिटॅमिन सी, डी, प्रथिने आणि कॅल्शिअम असते. शरीरात या घटकांसह फायबरची आवश्यकता असते.
फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत कार्य करते. फायबर फळे, भाज्या, कडदान्य आणि तेलबीयांमध्ये मुबलक प्रमाणात असते.
फायबरमुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. तसेच रक्तातील साखर आणि कोलेस्टॉल सारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास देखील मदक करू शकते.
दीर्घकालीन फायबरच्या कमतरतेमुळे मोठ्या आतड्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. बद्धकोष्ठतेची समस्या संपूर्ण पचनसंस्थेसाठी समस्या वाढवते.
रोजच्या आहारा हंगामी फळ आणि भाज्यांचा समावेश करावा. यामुळे शरीरातील फायबरची कमतरता कमी होते.
सफरचंद, नाशपाती, ब्रोकोली, गाजर, पालक यासारख्या पदार्थांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. तसेच तपकिरी तांदूळ, गहू आणि ओट्सचा आपल्या आहारात समावेश करावा.
आहारात बदाम, काजू यासारख्या सुकामेव्यांचा आहारात समावेश करावा. रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे देखील गरजेचे आहे.