Swarali Pawar
नांगरणी न करता थेट पेरणी करण्याची ही शेती पद्धत आहे. यात मातीची नैसर्गिक रचना जपली जाते.
वारंवार नांगरट केल्याने माती घट्ट होते, पाणी साचते आणि पिकांची वाढ कमी होते.
खोल नांगरणीमुळे मातीची धूप, कीटकांचा त्रास आणि खर्च वाढतो. यावर उपाय शून्य मशागत विकसित झाला.
या पद्धतीत कमी बियाणे लागतात आणि उगवण चांगली होते. मातीतील छिद्रही टिकून राहतात.
झिरो टिल सिड ड्रीलने जमिनीत बियाणे आणि खत एकाच वेळी टाकता येते. मशागत टाळता येते.
वारंवार नांगरणी न केल्यामुळे मातीतील कार्बन टिकतो आणि सुपीकता वाढते.
माती न उकरल्याने पाऊस व सिंचनाचे पाणी जास्त काळ टिकते. दुष्काळातही फायदा होतो.
नांगरणी, वखरणी टाळल्याने डिझेल, मजुरी आणि खतांवरचा मोठा खर्च वाचतो. पैठणच्या शेतकऱ्यांनी शून्य मशागतीतून ३०–३५ हजार रुपये वाचवले आणि झाडे निरोगी ठेवली.