Anuradha Vipat
मोबाईलची बॅटरी लवकर संपण्यामागे आणि बॅटरी खराब होण्यामागे काही महत्त्वाच्या तांत्रिक चुका जबाबदार असतात.
स्क्रीनचा जास्त ब्राइटनेस बॅटरीचा सर्वात मोठा शत्रू आहे. नेहमी 'Auto Brightness' मोड चालू ठेवा .
आपण अनेक ॲप्स उघडून तशीच सोडून देतो. ती बॅकग्राउंडला चालू राहतात.
गरज नसताना GPS , ब्लूटूथ आणि वाय-फाय चालू ठेवल्याने फोन सतत सिग्नल शोधत राहतो आणि बॅटरी खर्च होते.
प्रत्येक ॲपचे नोटिफिकेशन आल्यावर स्क्रीन चालू होते आणि साऊंड/व्हायब्रेशनमुळे बॅटरी खर्च होते.
जर तुमचा फोन २-३ वर्षांहून जुना असेल, तर बॅटरीची क्षमता नैसर्गिकरित्या कमी झालेली असू शकते.
रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवल्याने 'ओव्हरचार्जिंग' होते, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते.